आज दिनांक. 08/02/2023 रोजी मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग, नाशिक विभाग, नाशिक मा. सौ चित्र कुलकर्णी तसेच मा. श्री प्रशांत घाडगे अव्वल कारकून विभाग आयुक्त कार्यालय नाशिक विभाग नाशिक यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांच्या कार्यालयास भेट दिली याप्रसंगी माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी मिलेट बास्केट देऊन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य धान्य प्रचार प्रसिद्धीच्या अनुषंगाने माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य सेवा लोकसेवा हक्क आयोग नाशिक विभाग नाशिक यांचे स्वागत केले तसेच मिलेट बुके देऊन माननीय कृषी उपसंचालक श्री अनिल भोकरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी मान्य आयुक्त महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग नाशिक विभाग नाशिक यांचे स्वागत केले तसेच याप्रसंगी पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धीचे पोस्टरचे विमोचन करण्यात आले तसेच इतर सामाजिक संस्था यांच्या संयोगाने विविध गाड्यांना लावण्यात येणारे स्टिकर्स पोस्टर्स यांचे देखील विमोचन करण्यात आले तसेच पूर्व संपूर्ण कार्यालयात नोटीस बोर्डवर विविध लावलेल्या तृणधान्य प्रचार प्रसिद्धींच्या पोस्टर ना भेट दिली तृणधान्याबद्दल माहिती जाणून घेतली तसेच जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे कृषी सेवा केंद्र यांचे परवाने ऑनलाईन पद्धतीने दिले जात असल्याचे व कृषी सेवा केंद्राच्या परवाने मंजूर प्राप्त असलेले अर्ज यांचा अहवाल सादर केला