दिनांक ७/०२/२०२३ रोज मंगळवार ला दुसऱ्या सत्रात कुषी विभाग व आत्मा अंतर्गत आतंरराष्ट्रीय तृणधान्य वर्षा निमित्य कार्यशाळेचे मौजा सुलतानपुर येथे महिला गटांना, ज्वारी पासून विविध पदार्थ बनविणे या विषयाबाबत महिला प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले . सदर प्रशिक्षण करीता मार्गदर्शक कृ.वि.के, सेलसुरा चे सहायक प्राध्यापक डॉ.प्रेरणा धुमाळ यांनी ज्वारी पासून विविध पदार्थ बनविणे या बाबत उपास्थित महीलाना कृती करुण समजावून माहिती दिली व श्री अमोल गहुकर यानी तृण धान्य पिकाचे आहारातील महत्त्व व हरभरा पिकातील किड रोग व्यवस्थापन बाबत माहिती दिली.तसेच श्री एम वाय डोफे, तालुका कृषी अधिकारी यांनी कृषि विभागाच्या योजने विषयी माहिती दिली व सदर प्रशिक्षणा करीता कुषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील श्रीमती धुमाळ मॅडम यांच्या मार्फत ज्वारी चे उसळ, सूप, खिचडी व ज्वारीच्या खारोड्या ई.पदार्थ बनवून माहिती देण्यात आली.सदर प्रशिक्षणात मौजा उमरी, सुलतानपूर, वालधुर व कडाजना येथील महिलांनी सहभाग घेतला व कार्यक्रमाचे आयोजन श्री ए एन देवतळे स त व्य यांनी केले तर आभार प्रदर्शन कू सुचिता केंद्रे, कृ. स यांनी केले.