जिल्हास्तरीय आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 समिती बैठक व कार्यशाळेचे आयोजन

नाशिक ता. 10 जानेवारी 2023 रोजी मध्यवर्ती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मा.गंगाथरन डी., मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नाशिक मा. श्रीमती आशिमा मित्तल त्याचप्रमाणे इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पौष्टीक तृणधान्य माहितीचे पोस्टरर्स व घडीपत्रिकांचे विमोचन करण्यात आले. यावेळी आहारतज्ञ असोशिएशन नाशिक च्या अध्यक्षा डॉ.हिमानी पुरी व भरडधान्य अभ्यासक श्रीमती निलिमा जोरवर यांनी पौष्टिक तृणधान्य विषयी उपस्थित अधिकारी यांना मार्गदर्शन केले. विविध विभागांनी आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही व प्रचार प्रसिध्दी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मा.जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर उपस्थितीत अधिकारी यांनी पौष्टीक तृणधान्यापासून तयार करण्यात आलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थाचा आस्वाद घेतला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →