मा.जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावार यांचे मौजे कारभारवाडी,  तालुका-  करवीर भेटी वेळी  तृणधान्या पासुन  बनवलेले पदार्थ वाटप.

” आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 ” निमित्त मा.जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावार यांनी मौजे कारभारवाडी,  तालुका-  करवीर येथे दिनांक – 3/02/2023 रोजी भेट दिली त्यावेळी  तृणधान्या पासुन  बनवलेले पदार्थ वाटून पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम साजरा केला. तसेच गटशेती अंतर्गत कै. शिवा रामा पाटील कृषी शेतकरी स्वयंसहाय्यता गट  अंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी करुन येथील विद्यार्थिनी, महिला व ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देवून लाभ घेण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, कै. शिवा रामा पाटील शेतकरी स्वयंसहाय्यता गटाचे अध्यक्ष प्रा. डॉ. नेताजी पाटील, उपसरपंच तेजस्विनी पाटील, सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

    या भेटीचे वेळी उपस्थित सर्व मान्यवर व ग्रामस्थांना  अल्पोपाहार वेळी तृणधान्य पासुन  बनवलेले पदार्थ  जसे नाचणी अंबिल, नाचणी पापड,  ज्वारी पापड,  राजगिरा लाडू वाटण्यात आले. पारंपरिक पदार्थ चव चाखण्यास मिळाल्या मुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले व उपक्रमाचे कौतुक केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →