पौष्टिक तृणधान्य पिकाच्या जनजागृतीसाठी भुदरगड तालुक्यामध्ये बाईक रॅलीचे आयोजन.

पौष्टिक तृणधान्य पिकाची आवश्यकता सर्वसामान्या पर्यंत पोहोचविण्यासाठी भुदरगड तालुक्यामध्ये दि.०२-०२-२०२३ रोजी बाईक रॅलीचे आयोजन तालुका कृषि अधिकारी भुदरगड यांचे वतीने करणेत आले.

आदमापूर येथून रॅलीची सुरवात सरपंच श्री विजय गुरव यांचे हस्ते तसेच उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांचे उपस्थितीत करणेत आली. पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व या विषयी तालुका कृषि आधिकारी श्री किरण पाटील यांनी माहिती दिली . कूर मध्ये बाईक रॅलीचे स्वागत सरपंच श्री.मदनदादा पाटील यांनी केले. सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांनी सदर कार्यक्रामास शुभेच्छा देवून मनोगत व्यक्त केले. पौष्टिक तृणधान्य विषयक घोषणा देनेत आल्या. कूर मार्गे रॅली निलपण, कोनावडे, म्हसवे, करडवाडी, गावामधून कडगाव येथे आली. सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांनी सदर कार्यक्रामास शुभेच्छा देवून मनोगत व्यक्त केले. कडगाव मधून रली वेसर्डे गावात आली. सरपंच सौ लक्ष्मी शिंदे , उपसरपंच श्री मनोज चव्हाण व ग्राम पंचायत सदस्य यांनी सदर कार्यक्रामास शुभेच्छा देवून मनोगत व्यक्त केले. पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व या विषयी तालुका कृषि आधिकारी श्री किरण पाटील यांनी व लागवडी विषयी मंडळ कृषि आधिकारी श्री एन .डी भांडवले यांनी माहिती दिली. तसेच अन्न दाता शेतकरी बचत गट यांचे वतीने उपस्थित सर्व शेतकरी,आधिकारी व कर्मचारी यांना पौष्टिक तृणधान्य नागलीचे पदार्थ वाटप करणेत आले. वेसर्डे गावामधून रली नवले, वेगरूळ, शेलोली, पुष्पनगर गावामधून प्रचार प्रसिद्धी करत गारगोटी येथे आलेनंतर रॅलीची सांगता करणेत आली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →