आज दि. ७/२/२०२३रोजी मौजे -निहे ता.जि.पालघर येथे पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३चित्ररथाचे उत्साहात स्वागत करण्यात आले , पौष्टीक तृणधान्या बाबत गावात रथामार्फत प्रचार प्रसिद्धी करण्यात आली, ग्रामस्थांना सभा घेऊन पौष्टीक तृणधान्याच्या महत्वाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.आजच्या कार्यक्रमात कृप -श्री. गुरुनाथ माळगावी ,कृस श्री. प्रमोद मांगात यांनी मार्गदर्शन केले.
रथाचे स्वागत मा.श्री कमलाकर अधिकारी -सदस्य पं.स.पालघर यांनी श्रीफळ फोडून केले, कार्यक्रमास -हेमंत पाटील माजी सरपंच निहे,श्रीम.अर्पिता पाटील उपसरपंच-निहे,चेतनआंबेकर ग्रा.पं.सदस्य,उमेश फर्ले ग्रा.पं. सदस्य,भावना पुंजारा ग्रा.पं. सदस्य,भानुमती ठाकुर ग्रा.पं. सदस्य,मनाली पाटील बचत गट प्रमुख,प्रतिभा पाटील अंगणवाडी कार्यकर्ती,रोहीणी पाटील व प्राची शिंगडा ग्रापं कर्मचारी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते .