कृषी विभाग व आत्मा अंतर्गत आतंरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्य आज दि.02/02/2023 रोजी सोमसाई मंदिर , गाव – उमरी, ता. कारंजा घाटगे, जि वर्धा येथे महिला गटांना, ज्वारी पासून विविध पदार्थ बनविणे या विषयाबाबत महिला प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले . सदर प्रशिक्षणाकरीता मार्गदर्शक डॉ.प्रेरणा धुमाळ. मंडळ कृषी अधिकारी कारंजा श्री आर. ए. वाघमारे, कृषी सहाय्यक श्री पी. के. कदम व श्री एस. एम. चौधरी ता. तंत्र. व्यवस्थापक उपस्थित होते. श्री एस. एम. चौधरी यांनी संचालन केले तर श्री आर. एस. वाघमारे यांनी तृणधान्याचे आहारातील महत्व व आवश्यकता याबाबत माहिती दिली.सदर प्रशिक्षणा करीता कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील गृहविज्ञानतज्ञ श्रीमती प्रेरणा धुमाळ यांनी ज्वारी च्या लाह्या बनविणे,पॉपकॉर्न बनविणे, ज्वारी लाह्यांचा चिवडा बनविणे, ज्वारी लाह्यांचे लाडू बनविणे, ज्वारी लाह्यांचे नृट्रीशन बार बनविणे बाबत माहिती देण्यात आली.