शिरगाव ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे शिरगाव माध्यमिक विद्यालय व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त प्रचार प्रसिद्धी रॅलीचे आयोजन.

शिरगाव ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे रयत शिक्षण संस्थेचे शिरगाव माध्यमिक विद्यालय व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त प्रचार प्रसिद्धी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थी वर्ग शेतकरी गावच्या सरपंच सौ . निता शिंदे उपसरपंच तसेच तालुका कृषी अधिकारी चिपळूण पवार साहेब यांचे उपस्थितीत पौष्टिक तृणधान्य आपल्या कुटुंबामध्ये वापर करण्याची शपथ कृषि पर्यवेक्षक मनोज गांधी यांनी दिली .
हायस्कूल मधील सर्व विद्यार्थी यांना पोषण आहारामध्ये नाचणीचे पापड तालुका कृषी अधिकारी व सरपंच यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता त्यामध्ये विद्यार्थ्यांनी, शेतकरी वर्गाने सेल्फी काढण्याचा आनंद घेतला . त्यानंतर शिरगाव बाजारपेठ मध्ये घोषणा देत रॅली काढण्यात आली व कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन कृषि सहाय्यक दादा खारतोडे यांनी केले होते .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →