आज मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी प्रशासकीय इमारत अ जिल्हा मुख्यालयी चित्र रथाचे उद्घाटन करण्यात आले.पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी चित्ररथ मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री नेरकर सर यांचे हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. ह्या चित्र रथ मार्फत पौष्टीक तृणधान्य बाबत महत्व पटवून देण्याचे काम ग्रामस्तरावर कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक करतील. चित्र रथ सोबत घोषणा व म्हणी सांगणे साठी ललित वझे(नाना पाटेकर) आहेत.आजपासून पालघर जिल्ह्यात हा रथ फिरवला जाणार आहे.यासाठी संबंधित तालुक्यातील आत्माचे समन्वयक यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. गावातील किंवा शहरातील मुख्य ठिकाणी पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन करण्यात येईल.