दिनांक ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील मौजा तुळजापूर तालुक्यातील मौजा काकरंबावाडी येथे क्षेत्रीय भेटीद्वारे शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती देण्यात आली. हा महिना ज्वारी पिकासाठी समर्पित असल्याचे देखील यावेळी उपस्थितांना सांगण्यात आले. या भेटीदरम्यान गावाचे पोलीस पाटील व इतर शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रम कृषि सहायक अमृता पाटील यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.