मौजे डिंगणे तालुका सावंतवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत महिला शेतकऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग 06/02/2023 in Technical Tagged सिंधुदुर्ग - 0 Minutes दिनांक 17/01/2023 रोजी मौजे डिंगणे तालुका सावंतवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत महिला शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले या प्रशिक्षणामध्ये तालुका कृषी अधिकारी माननीय श्री बनकर साहेब यांनी पौष्टिक तृणधान्य पिकांचा आहारातील महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले.तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांचे पाककला कृतींचे स्पर्धा घेणे बाबत उपस्थित महिला भगिनींना आवाहन केले. मंडळ कृषी अधिकारी श्री भुईंबर साहेब यांनी आहारामध्ये फास्ट फूड चा वापर न करता अधिकाधिक पौष्टिक तृणधान्यांचा वापर करावा याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सेंद्रिय शेती पीएम किसान केसीसी रब्बी क्षेत्र विस्तार मग्रारारोहयो याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता कृषी सहाय्यक श्रीमती पल्लवी सावंत मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली सर्वांचे आभार मानून यशस्वीरित्या कार्यक्रम पूर्ण केला. शेअर करा...