दाणोली ता . सावंतवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने शेतकरी मेळावा

दिनांक 17/0 1/ 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने आज दानोलि येथे सातूळी व केसरी या दोन्ही गावांमधील शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी श्री. शिंदे साहेब यांनी उपस्थिती होतें तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या केसरी व सातूळी गावचे कृषी सहाय्यक श्री मिलिंद निकम यांनी जागतिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने मानवी आरोग्यासाठी तृणधान्यांचे महत्त्व . पहिला गट आणि दुसरा गट अशा दोन प्रकार चे गट आहे तर पहिल्या गटाचे महत्व आणि दुसऱ्या गटाचे महत्व येथे विस्तृत मार्गदर्शन केले तसेच पहिल्या गटांमध्ये ही तृणधान्ये येत आहेत राळे, वरई, भंगर, बर्टी, कोद्रा , ब्राऊन टॉप मिलेट ची सहा प्रकारची पौष्टिक तृणधान्य आहारात असणे अत्यंत आवश्यक आहे याचं महत्त्व श्री निकम साहेबांनी शेतकऱ्यांना पटवून दिला तसेच दुसऱ्या गटांमध्ये असणारी ज्वारी बाजरी आणि नाचणी ही तृणधान्ये पण महत्त्वाची आहेत हे याचे पण त्यांनी मार्गदर्शन केले आपल्या शरीरावर दिवसेंदिवस विपरीत परिणाम होत आहे कोरोना सारख्या महामारी मध्ये आपण अनुभवले तृणधान्य व भरडधान्य जर योग्य प्रकारे मानवाच्या शरीरामध्ये गेली तर माणसाची प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे राहू शकते म्हणून तृणधान्य ही माणसाच्या शरीरात अत्यंत महत्त्वाचे आहे अशा योग्य प्रकारचे मार्गदर्शन आपल्या केसरी गावची कृषी सहाय्यक श्री मिलिंद निकम साहेबांनी केली तसेच या शेतकरी मेळावा मध्ये मंडळ कृषी श्री शिंदे साहेब यांनी तृण धान्यांमध्ये आहारातले महत्त्व याची सखोल मार्गदर्शन केले तसेच कृषी विभागांमध्ये अत्यंत महत्त्वाची योजना आहे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना याच्याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले तदनंतर कृषी पर्यवेक्षक श्री यशवंत सावंत सर यांनी कृषी विभागाच्या महाडीबीटी, म. ग्रा. रो.हि.यो., अपघात विमा योजना याच्याबद्दल मार्गदर्शन केले या योजना सांगत असताना त्यांनी तृणधान्यांबद्दल पण मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर विदर्भ कोकण ग्रामीण बँक च्या मॅनेजर मॅडम श्रीमती एस जी उईके मॅडम यांनि किसान क्रेडिट कार्ड संदर्भात कशाप्रकारे काढले पाहिजे आणि ते काढल्यामुळे शेतकऱ्यांना काय काय विकास होऊ शकतो याचं सखोल मार्गदर्शन केले . त्यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया योजना याच्यासाठी जिल्हा संसाधन अधिकारी आपल्या जिल्ह्याचे श्री प्रताप प्रकाश चव्हाण सर उपस्थित होते या योजनेबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना विस्तृत प्रकारे माहिती देण्यात आली ते पण योजना काय आवश्यक आहे किती किती टक्के योजनेचे अनुदान भेटलं जातं आणि ही योजना केल्यावर तुम्ही कशाप्रकारे व्यवसाय करू शकता आणि तुमचे पायावर उभे राहू शकतात मार्गदर्शन श्री प्रताप चव्हाण सरांनी केले. त्यानंतर महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्र आत्मा आपल्या सावंतवाडी तालुक्याच्या बीटीएम मॅडम श्री मिलन परब मॅडम हे उपस्थित होत्या यामध्ये त्यांनी भाजीपाला शेतीशाळा का महत्त्वाची आणि शाळेचे महत्त्व विस्तृत मार्गदर्शन केले शेतीसाठी आपल्या केसरी व सातूळी गावच्या महिला बचत मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यासाठी केलेल्या मार्गदर्शक बद्दल सर्व महिला गटाने श्रीमन मॅडम यांचे आभार मानले सदर कार्यक्रमासाठी चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या शेतकऱ्यांचा दिसून आला या कार्यक्रमासाठी आपल्या केसरी गावच्या सरपंच श्रीमती स्नेहल कासले मॅडम तसेच उपसरपंच श्री संदीप पाटील साहेब पण उपस्थित होते दोन्ही गावातील मिळून प्रगतशील शेतकरी तसेच या बचत गटांमध्ये प्रभाग संघाच्या प्रमुख श्रीमती मंजिरी बांदेकर मॅडम पण उपस्थित होत्या तसेच या गावचे कृषी मित्र श्री प्रदीप बाबू सावंत गोलाकार परसबाग चे मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमती प्रिया गावडे मॅडम उपस्थित होत्या. आंबोली गाव चे कृषी सेवक श्री सावंत आनंदा घेरडे साहेब व शिरशिंगे गावचे कृषी सहाय्यक श्री अक्षय राजन खराडे उपस्थित होते. हा कारण यशस्वी होण्यासाठी कृषी विभागाने विशेष मेहनत घेतली .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →