महाराष्ट्र शासन कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 निमित्ताने मौजे जांभुळणी ता-आटपाडी जिल्हा सांगली येथे श्री. विठ्ठल दादा मासाळ या ज्वारी उत्पादक शेतक-याच्या शेतामध्ये हुरडा पार्टीचे आयोजन केले. हुरडा का खावा याची माहिती कृषी सहायक संजय काळेल यांनी दिली.तसेच पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगितले.यावेळी सरपंच सौ सुनिता जुगदर मॅडम, माजी चेअरमन महादेव मासाळ, पोलिस पाटील अनिता पाटील मॅडम, एन. एस. एस. चे चंदनशिवे सर व प्रगतशील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सर्वांनी हुरडा पार्टिचा आस्वाद घेतला.व कार्यक्रम संपन्न झाला.