गोठोस तालुका कुडाळ येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त महिला मेळाव्याचे आयोजन

दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी गोठोस मांडेशेतवाडी येथील प्रगतीशील शेतकरी श्री विष्णू महादेव ताम्हाणेकर यांच्या घरी मंडळ कृषी अधिकारी माणगाव कार्यालय व कामधेनू शेतकरी बचत गट गोठोस यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्रीम गायत्री तेली; कृषी पर्यवेक्षक गीता परब ; कृषी सहाय्यक डी एल कदम; व्ही आर सावंत; PMFME DRP श्रीम. स्वप्नाली कदम; आत्मा समिती सदस्य श्री विष्णु ताम्हाणेकर तसेच महिला व इतर शेतकरी उपस्थित होते. यावेळी महिलांकरिता हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून कृषी सहायक श्री. धनंजय कदम यांच्याकडून 100 महिलांना राजगिरा लाडू पाकीट वाण म्हणून वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात तृणधान्याचा शेतकऱ्यांनी आहारामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश करावा व भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात तृणधान्यांना बाजारपेठ मिळवून द्यावी याचे आवाहन मंडळ कृषी अधिकारी माणगाव कार्यालयातील कर्मचारी यांच्याकडून करण्यात आले. या कार्यक्रमाकरीता बहुसंख्येने महिला व शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →