सातार्डा तालुका- सावंतवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षनिमित्त पाककला स्पर्धा व कृषी विषयक प्रशिक्षण

मौजे सातार्डा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षनिमित्त पाककला स्पर्धा व कृषी विषयक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी आजी व माजी सरपंच , पोलीस पाटील, मंडळ कृषी अधिकारी श्री. भुइंबर , कृषी पर्यवेक्षक श्रीमती देसाई व श्री सरगुरू, कृषी सहाय्यक श्रीमती गवंडे मॅडम, श्री गाड व श्री अतुल माळी व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व, pmfme, kcc या बाबत श्री भुईंबर यांनी मार्गदर्शन केले. आंबा व काजू कीड संरक्षण व कृषी विभागाच्या विविध योजना विषयी श्री सरगुरू यांनी मार्गदर्शन केले.सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर श्री अमित कुमार यांनी किसान क्रेडिट कार्ड व कृषी कर्ज योजनांची माहिती दिली. बँकेत येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या आवश्यकतेनुसार कृषी वित्त पुरवठा करण्यास बँक नेहमीच तयार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.Mregs योजने तून गांडूळ खत उत्पादन व सेंद्रिय शेती बाबत श्रीमती देसाई यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन श्री गाड यांनी केले. पाककला स्पर्धा परीक्षक म्हणून श्रीमती देसाई व श्रीमती गवंडे यांनी काम पाहिले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →