आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-२०२३, ज्वारी समर्पित महिना फेब्रुवारी निमित्त जि.प.शाळा,हातनूर ता.भुसावळ येथिल विद्यार्थी व शिक्षक वृंदांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याविषयी श्री.डी.एम.चौधरी मं.कृ.अ.वरणगाव, श्री.एम.पी.शिंदे कृ.स. यांनी मार्गदर्शन केले,तसेच पौष्टिक तृणधान्यची घोषवाक्य व म्हणी पोस्टरच्या माध्यमातून विद्यार्थांकडून वदवून घेतल्या.या कार्यशाळेत हातनुर ग्रा.पं.सरपंच सौ.सुवर्णा सपकाळे,श्री.संतोष तायडे सर,शिक्षक वृंद व श्री.प्रजापती कृ.स.टहाकळी आदी उपस्थित होते.