आज दिनांक ०६ फेब्रुवारी २०२३ रोजी उस्मानाबाद तालुक्यातील मा. उपळा या गावात कृषी विभागच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त संपूर्ण गावात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सदर फेरीत पौष्टिक तृणधान्य वर्ष बाबत जनजागृती तसेच पौष्टिक तृनाधाण्याचे महत्व इ बाबत फलक बोर्ड इ वापरून शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी गावात काढण्यात आली. प्रभात फेरी द्वारे ग्रामस्थांना पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती देण्यात आली. प्रभात्र फेरी झाल्यानंतर शालेय सर्व विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती व त्यांचे आहारातील महत्व विविध मान्यवरांनी समजावून सांगितले.
यावेळी गावातील आहारतज्ञ डॉ. सौ.घोगरे रोहिणी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्य का महत्वाचे आहे याचे विवेचन केले. तालुका कृषि अधिकारी श्री. डी आर. जाधव यांनी विद्यार्थ्यांना आपल्या रोजच्या डब्ब्यात ज्वारीची भाकरी, भगरीचा शिरा इ चा समावेश करण्याबाबत आवाहन केले. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चे जिल्ह्याचे नोडल अधिकारी श्री. संदीप ढोणे यांनी विद्यार्थ्यांना खेळत प्राविण्य मिळवायचे असेल तर चांगल्या शरीरस्वास्थ्यासाठी आपल्या आहारात मैदा व गहू यांचा वापर कमी करून नाचणी, बाजरी इ चा समावेश करण्याबाबत आवाहन केले. कृषि सहायक श्री. वैभव लेनेकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्य यांचा समावेश करण्याबाबत शपथ दिली. या कार्यक्रमास गावचे सरपंच सुहास घोगरे, उपसरपंच विकास पडवळ, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देशमुख, जि. प. प्रा. मुख्याध्यापक श्री.. एल. बी. पडवळ, हरिभाऊ घोगरे हायस्कूल चे प्राचार्य उजन्कर सर, विकास पडवळ सर, ग्रामपंचायत सदस्या सौ. जगदाळे ग्रामविकास अधिकारी भोईटे साहेब इ. कृषि सहायक श्री. आर. बी. अडसूळ उपस्थित होते. सदर कार्यक्रम कृषि पर्यवेक्षक श्री. एल. जी. मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमास गावातील सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.