आज मौजे कारेगाव तालुका शिरूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत आहारातील तृणधान्याचे महत्त्व व आरोग्यविषयक पौष्टिक तृणधान्य बाबतची जनजागृती बाबत कृषी विभागाच्या वतीने कृषी पर्यवेक्षक कामटे साहेब यांनी मार्गदर्शन केले तसेच कृषी विभागाच्या विविध योजना ची माहिती व नारायणगाव येथील कृषी प्रदर्शनाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली याप्रसंगी पंचायत समिती शिरूर चे माजी सभापती विश्वास आबा कोकडे त्याचबरोबर सरपंच संदीप भैय्या नवले व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.