आज दिनांक ०३/०२/२०२२ मौजे :मगरवाडी, तालुका बारामती येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी कृषी पर्यवेक्षक माने साहेब य्यांनी पौष्टिक तृणधान्यचे आरोग्य व आहारातील महत्त्व याविषयी माहिती दिली . तसेच कृषी सेवक शरद सावंत यांनी उन्हाळी बाजरी पीक उत्पादन तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उन्हाळी बाजरी बियाणे व निविष्ठा वाटप करण्यात आले.