आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 निम्मित कृषि विभागामार्फत दांनवाड ता.- शिरोळ येथे कार्यक्रमा चे आयोजन करनेत आले. सदर कार्यक्रमासाठी कृषि विभागाचे अधिकारी / कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. नाचणी, वरई, राजगिरा, ज्वारी व बाजरी इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकांसंदर्भात सविस्तर माहिती देऊन, पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील असलेले महत्त्व व फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच मंडल कृषि अधिकारी यांनी ऊस उत्पादकता वाढ अभियान, प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी माहिती दिली.