आज दिनांक 3/2/2023 रोजी मौजे कोंबडवाडी येथे ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ निमित्त कार्यक्रम घेण्यात आला.तृणधान्याचे आपल्या आहारातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तृणधान्याबाबत प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी जे कार्यक्रम घ्यायचे आहेत त्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी गावचे सरपंच श्री.मुकुंद सोकांडे,उपसरपंच श्री.गुणवंत घाडगे,ग्रामसेविका माधवी लोखंडे, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य,आशा कार्यकर्ती सौ.मीरा जाधव, महिला बचत गटाच्या सदस्य सौ.संगीता घाडगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आर. बी.अडसूळ यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.