काणेगाव ता.लोहारा जिल्हा उस्मानाबाद येथे मिलेट मंथ कार्यक्रम संपन्न

दिनांक 01/02 /2023 रोजी मौ काणेगाव. ता. लोहारा येथे ग्रामपंचायत कार्यालय काणेगाव येथे पौष्टिक तृणधान्य महत्व याबद्दल कार्यक्रम घेतला व प्रचार प्रसिद्धी करण्यात आली तसेच त्याचे आहारातील महत्व सांगण्यात आले. यावेळी मा. सरपंच श्री नामदेव लोभे उपस्थित होते. त्यांनी यावेळी तृणधान्य पेरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले तसेच कृषी सहाय्य व्ही व्ही पवार यांनी तृणधान्य महत्व सांगितले. त्यांनतर श्री. तरमुडे यांच्या शेतात क्षेत्र भेटी दरम्यान ज्वारी पिकाचे महत्व सांगण्यात आले. यावेळी प्रगतीशील शेतकरी श्री अंकुश तरमुडे, श्री. श्रीकांत कदम तसेच इतर शेतकरी उपस्थित होते. यावेळी ज्वारी पिकाचे महत्व तसेच मिलेट मंथ संकल्पना बाबत प्रचार प्रसिद्धी करण्यात आली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →