आष्टा कासार ग्रामपंचायत येथे पौष्टिक तृणधान्य बाबत सभा संपन्न

दिनांक 25/01/2023 रोजी मौजे आष्टा कासार ता.लोहारा ग्रामपंचायत कार्यालय येथे पौष्टिक तृणधान्य महत्व याबद्दल कार्यक्रम घेतला व प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. मा.तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग व मंडळ कृषी अधिकारी ज्ञानोबा रितापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे आष्टा कासार येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाचे प्रचार प्रसिद्धी करण्यात आली.तसेच त्याचे आहारातील महत्व सांगण्यात आले. यावेळी मा. सरपंच सौ सुलभा कांबळे व महिला बचत गटाचे अध्यक्ष सचिव व इतर महिला उपस्थित होते. तसेच येथील अंगणवाडी सेविका यावेळी तृणधान्यचे महत्व सांगून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच कृषी पर्यवेक्षक रवी बनजगोळे व कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी तृणधान्य महत्व सांगितले. तेव्हा महिला बचत गटाचे महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →