आज दिनांक 2/2/2023 रोजी मोजे दहिवद येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जनजागृती व प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्नप्रक्रिया योजना जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमास जिल्हा संसाधन व्यक्ती कृषिभूषण प्रवीण पाटील सर ,प्रवीण पाटील कृषी पर्यवेक्षक पातोंडा ,खैरनार साहेब कृषी सहाय्यक निलेश पाटील कृषी सहायक, दहिवद गावचे सरपंच, महिला बचत गटाच्या सदस्य व इतर शेतकरी उपस्थित होते कृषी भूषण प्रवीण पाटील साहेब यांनी अन्नप्रक्रिया उद्योग बद्दल सखोल माहिती शेतकऱ्यांना दिली तसेच कृषी पर्यवेक्षक प्रवीण पाटील साहेबांनी आहारातील तृणधान्य चे महत्व शेतकऱ्यांना समजून सांगितले व आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक निलेश पाटील यांनी केले