“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” निमित्य जिल्हा स्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन मा. श्री भाऊसाहेब ब-हाटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक, आत्मा, चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी आत्मा सभागृह, चंद्रपूर येथे करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री रविंद्र मनोहरे, कृषि उपसंचालक तथा जिल्हा नोडल अधिकारी, महामिलेट, श्री चंद्रकांत ठाकरे, तालुका कृषि अधिकारी, चंद्रपूर, श्रीमती हुसे, कार्यक्रम समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ, श्री भास्कर गायकवाड, मंडळ कृषि अधिकारी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी ज्वारी उत्पादक शेतकरी, महिला बचत गटाचे गट प्रमुख, तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माहे फेब्रुवारी महिन्यात ज्वारी या पौष्टिक तृणधान्याची मिलेट ऑफ द मंथ मध्ये निवड असल्याने आणि ज्वारी पिकाची जिल्ह्यात दुप्पट क्षेत्रवाढ झाल्याने कृषि महोत्सवात मोठ्या प्रमाणात ज्वारी उत्पादक शेतक-यांनी ज्वारी पासून प्रक्रिया युक्त खाद्य पदार्थ सह विक्रीसाठी सहभागी होण्याबाबत तयारी दर्शविली. या प्रसंगी कृषि विभागाचे कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक, शेतकरी सल्लागार समितीच्या सदस्या श्रीमती रामटेके, उमेद आणि माविम मधील गटाच्या सदस्य आणि मोठ्या संख्यने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांसाठी स्वादिष्ट ज्वारीची भाकरी आणि वांग्याचे भरीताची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री दातारकर यांनी तर आभारप्रदर्शन कृषि सहायक श्री रोशन गायकवाड यांनी केले.