आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने मौजे शिवाजीनगर साक्री जि. धुळे येथे तालुकास्तरीय कार्यशाळेचे अयोजन करण्यात आले.

मौजे शिवाजीनगर तालुका साक्री येथे तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस तालुका कृषी अधिकारी श्री सिके ठाकरे, पिंपळनेर मंडळ कृषी अधिकारी तानाजी सदगीर, दहिवेल मंडळ कृषी अधिकारी श्री हरिदास पवार, शिवाजीनगर चे उपसरपंच श्री दयाराम ठाकरे, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे सह परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सदर कार्यशाळेमध्ये पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्य वरील प्रक्रिया उद्योगास संधी याविषयी तालुका कृषी अधिकारी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा लाभ घेऊन अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →