मौजा इटोली ता. बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य प्रशिक्षण

दिनांक 15/01/ 2023 रोजी आदर्श सार्वजनिक भवन इटोली येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम सण 2023 अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले या प्रशिक्षणाला ग्रामपंचायत सरपंच तुळशीदास पिपरे उपसरपंच नरेश बुरांडे तसेच इतर सदस्य व शेतकरी बंधू उपस्थित होते.या कार्यक्रमात श्री टाले सर कृषी सहाय्यक कवडजयी यांनी प्रस्ताविक करून पौष्टिक तृणधान्य चे महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले, त्यानंतर सौ एस. ए. बोभाटे कृषी सहाय्यक इटोली यांनी शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्यचे आहारातील महत्व तसेच ज्वारी पेरणी क्षेत्रात वाढ करणे, इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. श्री हराळ सर यांनी पौष्टिक तृणधान्याचे आरोग्यातील महत्त्व याविषयी महिती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →