दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत मौजा किन्ही येथे तालुकास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी, बल्लारपूर श्री बी एस सलामे साहेब यांनी शेतकऱ्यांना तृणधान्ये जसे ज्वारी, बाजरी, नाचणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
सौ एस ए बोबाटे मॅडम कृप बल्लारपूर यांनी शेतकऱ्यांना तृणधान्याचे मानवीआहारातील महत्त्व याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. सदर कार्यक्रमाला किन्ही ग्रामपंचायत सरपंच सौ एस. एम सत्रे मॅडम, पोलीस पाटील श्री अरुण बुच्चे, मंडळ कृषी अधिकारी, बल्लारपूर श्री बी एस सलामे साहेब, कृ प सौ एस ए बोबाटे मॅडम, कृषी सहाय्यक मानोरा श्री बबन हराळ, कृषी सहाय्यक किन्ही श्री बी. एन.पवार व गावातील शेतकरी बांधव अतुल सिडाम , मारुती पेंदोर, मोरेश्वर सत्रे, दिलीप उरकुडे, व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.