आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ निमीत्त जिल्हास्तरीय कार्यशाळा

आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ निमीत्त जिल्हास्तरीय कार्यशाळा अभियांत्रिकी सभागृह कृषि महाविद्यालय धुळे येथे दि.२४/०१/२०२३ रोजी  आयोजीत करण्यात आली होती. सदर कार्यशाळेस श्री.एस.डी.मालपुरे,श्री.विनय बोरसे, डॉ.जगदीश काथेपुरी,श्री.रोहीत कडु, श्री.धनराज चोधरी,श्री. आतीश पाटील, श्रीमती.पुष्पलता हिंगे,श्री.वाल्मीक पाटील, श्री.प्रकाश पाटील,श्री.श्रीराम शंकर पाटील,श्री.जी.टी. धोंगडे,श्री.वाल्मीक प्रकाश,श्री.सी.के.ठाकरे,श्री.ए.पी.निकुंभ,श्री.नवनाथ साबळे व सर्व मंडळ कृषि अधिकारी,कृषि पर्यवेक्षक,कृषि सहाय्यक तसेच जिल्हातुन महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यशाळेत कार्यक्रम समन्वयक डॉ.दिनेश नांद्रे यांनी पौष्टीक तृणधान्याविषयी शास्त्रीय विवेचन केले. जळगाव येथील आहार तज्ञ डॉ. अनंत पाटील पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्व विषद केले. डॉ. अमृता राऊत यांनी अन्न प्रक्रीया उद्योगांसाठी विविध मशनरी बाबत माहीत दिली. डॉ. खुशाल ब-हाटे यांनी बाजरी उत्पादन, सधन लागवड याविषयी शेतक-यांना मार्गदर्शन केले.तसेच चोगाव येथील श्री.श्रीराम शंकर पाटील यांनी बाजरी पिकाबाबतचे अनुभव कथन केले. सदर कार्यशाळेत पौष्टीक तृणधान्याचे माहितीपर प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →