“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” निमित्य पौष्टीक तृणधान्याविषयी जागृती करण्यासाठी मौजा वरवट, ता. चंद्रपूर येथे प्रभात फेरीचे आयोजन

“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023”
निमित्य पौष्टीक तृणधान्याविषयी जागृती करण्यासाठी आज चंद्रपूर तालुका कृषी अधिकारी कार्यलयामार्फत “मौजा वरवट” येथे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी पौष्टीक तृणधान्यांचे महत्व असलेल्या म्हणिचा वापर करून गावामध्ये घोषणा देऊन जनजागृती केली
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्य आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान कृषि सहाय्यक, यांनी पौष्टिक तृणधान्यांमधील “ज्वारी, बाजरी,नाचणी,राळा, राजगिरा,” यांचे मानवी आहारातील महत्व समजावून सांगितले.
तृणधान्यांपासून बनविलेल्या वेगवेगळ्या पदार्थाचा आपण रोजच्या आहारात समावेश करावा असे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थितांना “बाजरीची खिचडी” हा विशेष पदार्थ तयार करून अल्पोपहार म्हणून देण्यात आला.
याकरिता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे तसेच राजीव गांधी महाविद्यालयाचे शिक्षक वृंद व विध्यार्थी,ग्राम संघाच्या महिला ,महिला बचत गट ,कृषिमित्र,CRP, “ग्रामपंचायत सदस्य, ग्राम कृषि विकास समितीचे सर्व सदस्य” यांचे सहकार्य लाभले .

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →