मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे “महाराष्ट्र मिलेट मिशन” चा शुभारंभ.

आज दिनांक 31/01/2023 रोजी मा मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे यांचे हस्ते नचानीचा केक कापून ” महाराष्ट्र मीलेट मिशन” चे उद्घाटन झाले. या प्रसंगी मा कृषिमंत्री श्री अब्दुल सत्तार, मा उद्योग मंत्री श्री उदय सामंत, मा प्रधान सचिव श्री एकनाथ डवले, मा आयुक्त श्री सुनील चव्हाण व इतर आमदार उपस्थित होते. या वेळी चांगल्या आरोग्यासाठी व शेतकऱ्यांच्या फायद्या साठी सर्वांनी पौष्टिक तृणधान्य सेवन करण्याचे व त्याची प्रचार प्रसिध्दी करण्याचे आवाहन मा मुख्यमंत्री यांनी केले. या वेळी महाराष्ट्र मीलेट मिशन कार्यक्रम करिता 250 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मा मुख्यमंत्री यांनी जाहीर केले. व सदरील उपक्रमास शासनामार्फत सर्व तो परी मदत करण्याचे आश्वासन दिले.ज्वारी,बाजरी,नाचणी पिकविणाऱ्या उत्कृष्ट शेतकऱ्यांचा व प्रक्रिया धारक उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. तसेच सदरील उपक्रमाची वेबसाईट केलेल्या सहाय्यक कृषी अधिकारी संघटना व तीफन फाउंडेशन त्यांचे प्रतिनिधी श्री सुखदेव जमदाडे,संतोष पाटील,श्री भोर,श्री संदीप केवटे यांचा सत्कार करण्यात आला. सदरील प्रदर्शन व विक्री मधे राज्यातील बचत गट व उद्योजक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अंकुश माने, विभागीय कृषी सहसंचालक, कोकण, ठाणे व त्यांचे सहकारी अधिकारी यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा...

कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र

Learn More →