आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चे औचीत्त्य साधून दि. २६ जानेवारी २०२३ रोजी पौष्टिक तृणधान्य मेजवानी…

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चे औचीत्त्य साधून दि. २६ जानेवारी २०२३ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय परभणी यांचेकडून जिल्हास्तरीय पौष्टीक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी ज्वारी, बाजरी, भगर, राजगिरा, नाचणी या पौष्टिक तृणधान्यापासून बनवलेले पदार्थ जसे नाचणी pizza, ज्वारी cutlets, बाजरी सुप, बाजरीची खिचडी, भगरीचा शिरा असे व अनेक पदार्थ घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. या कार्यक्रमास परभणी शहरातील आहारतज्ञ डॉ. ज्योती साळुंके प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून लाभले, तसेच कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी, तंत्र अधिकरी उपविभागीय कृषी अधिकारी परभणी कार्यालय हे उपस्थित होते.

स्पर्धेस सहभागी असलेल्या महिला व प्रमुख पाहुणे
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →