संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाने “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ देशामध्ये साजरे करण्याच्या अनुषंगाने पौष्टीक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ करणे, तृणधान्यांमधील पोषणमूल्यांमुळे त्यांचे आहारातील अनन्यसाधारण महत्व विचारात घेऊन लोकांच्या आहारातील त्यांचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे, त्याअनुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन करणे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ जिल्ह्यामध्ये साजरे करण्यासाठी कृषि विभाग आणि सर्व संबंधित प्रशासकीय विभागामार्फत विविध उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील सर्व विभागांनी / यंत्रणांनी सक्रीय सहभाग घेऊन पौष्टीक तृणधान्याचे महत्व सर्व जनतेपर्यंत पोहचविणे व अंमलबजावणी करण्याकरिता जिल्हा कार्यकारी समितीची सभा सोमवार दि.३०.०१.२०२३ रोजी मा.जिल्हाधिकारी, सांगली यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सुरुवातीला श्रीमती मयुरा काळे तंत्र अधिकारी (विस्तार) यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने थोडक्यात माहिती व विविध विभागांनी करावयाची कार्यवाही याबाबत प्रस्ताविक केले. यावेळी मा.जिल्हाधिकारी महोदय यांनी कृषि विभाग, पोलीस विभाग व इतर सर्व विभागांना शासकीय कार्यक्रमाच्या नाष्टा व जेवणामध्ये पौष्टीक तृणधान्य पासून बनवलेले पदार्थाचा समावेश करणे बाबत सांगितले, तसेच रांगोळी स्पर्धा , चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धाचे आयोजन करणे, रोड शो, रॅली, मॅराथॉन स्पर्धा आयोजित करणे. तसेच जिम ओनर व त्यांचे प्रशिक्षक यांच्या मदतीने पौष्टिक तृणधान्य पदार्थाचा आहारामध्ये समावेश करणे याबाबत प्रचार प्रसिद्धी करणेच्या सर्व विभागांना सूचना दिल्या. सदर सभेस श्री.प्रकाश सूर्यवंशी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, श्रीमती प्रियांका भोसले कृषि उपसंचालक, तसेच जिल्हा कार्यकारी समितीचे सर्व सदस्य व कृषि विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.