भिवंडी येथील आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमित्त कार्यक्रम

भिवंडी

  • आज दिनांक-०५/०१/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष २०२३ अंतर्गत पंचायत समिती भिवंडी येथे तालुका कृषी अधिकारी-भिवंडी मार्फत प्रचार व प्रसिद्धी चा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यशाळा घेवून आहार विषयक तज्ञांद्वारे उपस्थित सर्व शेतकरी व महिला शेतकर्यांना पौष्टिक भरडधान्याचे आरोग्याच्या दृष्टीकोनातून असलेलले आहारातील महत्व पटवून देवून मार्गदर्शन केले.
  • या प्रसंगी कार्यक्रमाच्या ठिकाणी शेतकरी महिलांनी व कृषी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पौष्टिक तृण धान्यापासून तयार केलेल्या विविध खाद्य पदार्थ प्रदर्शन, विक्री व पाककृती कार्यक्रमाचे उदघाटन मा.विभागीय कृषी सहसंचालक -ठाणे श्री. अंकुश माने यांच्या हस्ते झाले. तसेच याप्रसंगी मा. पंचायत समिती सभापती श्री जितेंद्र डाकी, श्री. शैलेश शिंगोले मा. उपसभापती, डाॅ. प्रदीप घोरपडे,गटविकास अधिकारी,श्री.तुषार पाटील, आरोग्य तज्ञ,ठाणे इ.मान्यवर उपस्थित होते.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे

Learn More →