उस्मानाबाद येथे पौष्टिक तृणधान्य बाबत भित्ती पत्रके वाटप

उस्मानाबाद शहरातील बाल गणेश मंडळ तर्फे आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात जिल्ह्याचे नोडल अधिकारी श्री. एस. पी. ढोणे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या पौष्टिक तृणधान्य बाबत प्रचार प्रसिद्धी तसेच पौष्टिक तृणधान्य बाबत तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे वाटप उपस्थितांना करण्यात आले. यावेळी बोलताना नोडल अधिकारी श्री. एस. पी. ढोणे यांनी उपस्थितांना पौष्टिक तृण धान्य हे आपल्या आहारात का महत्वाचे आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा समावेश करावा असे आवाहन केले. यावेळी प्रतिष्टीत नागरिक श्री. भालचंद्र हुछ्हे उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →