क्रीडा स्पर्धेतील संचलनातही पौष्टिक तृणधान्याचाच बोलबाला

उस्मानाबाद जिल्हा कृषि विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक कला क्रीडा स्पर्धेत सर्व सहभागी संघांनी पथसंचलन केले होते. या पथसंचलनात तालुका कृषि कार्यालय वाशी भूम उमरगा परंडा व तुळजापूर या संघांनी आपापल्या पथ संचलनात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष २०२३ बाबत जन जागृतीपर संदेश हाती घेऊन पथ संचलन केले. तालुका कृषि अधिकारी उमरगा यांनी वेळा अमावस्याचे सादरीकरण करताना आपल्या आहारात तसेच शेतातील पिक पद्धतीत पौष्टिक तृणधान्याचा समवेश करण्याबाबत संदेश दिला. तालुका कृषि अधिकारी वाशी श्री. संतोष कोयले यांनी सपत्नीक पथ संचलनात सहभाग घेऊन उपस्थितांची विशेष दाद मिळवली. तुळजापूर तालुका संघाने मल्हार बानू व म्हाळसा यांना पौष्टिक तृण धान्य बाबतचा संदेश देतानाचा देखावा सादर केला. पथ संचलन परीक्षणासाठी उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शिवकुमार स्वामी यांनी पौष्टिक तृण धान्य बाबतचा देखावा केल्याबद्दल वाशी तुळजापूर परंडा संघाचे विशेष कौतुक केले. सदर स्पर्धेवेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. महेश तीर्थकर. प्रकल्प संचालाक आत्मा श्री.. जे. पी. शिंदे कृषि उपसंचालक श्री. अभिमन्यू काशीद इ उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →