आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2022 23 निमित्त महिलांना तृणधान्याचे आहारातील महत्त्व व बाजरी पिकाचे महत्त्व व त्यापासून विविध पदार्थ याविषयी मार्गदर्शन

दिनांक 25.01.2023 मौजे बोकनगाव तालुका लातूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2022 23 निमित्त महिलांना तृणधान्याचे आहारातील महत्त्व व बाजरी पिकाचे महत्त्व व त्यापासून विविध पदार्थ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच बाजरी पासून विविध पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ सुरेखा दयानंद स्वामी या होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती योगिता आरदवाड कृषी अधिकारी मॅडम व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री साचणे साहेब उपस्थित होते तसेच कृषी सहाय्यक श्रीमती रेनापुरकर एम एस व ग्रामसेवक श्रीमती तोडकर जे या उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाचे नियोजन देशभक्ती महिला गट यांच्यातर्फे उत्स्फूर्तपणे करण्यात आले होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य श्री आत्माराम शिंदे यांनी पार पाडले तसेच ग्रामपंचायत चे सदस्य शिवाजी दाताळ कर्मचारी श्री राम शिंदे शैलेश स्वामी यांनीही कार्यक्रमासाठी श्रम घेतले पाककला स्पर्धे साठी परीक्षक म्हणून श्रीमती आरदवाड मॅडम व चाचणी साहेब यांनी केले गावातील सर्व महिला बचत गट या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले जवळपास 200 हून अधिक महिला यांनी सहभाग नोंदविला उमेद महिला बचत गटाच्या संध्याकाळ कल्पना शिंदे उषा स्वामी यांनीही कार्यक्रमासाठी श्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर

Learn More →