उस्मानाबाद येथे कृषि कर्मचाऱ्यांनी साकारली पौष्टिक तृणधान्याची रांगोळी

उस्मानाबाद कृषि विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय कला क्रीडा महोत्सव चे आयोजन श्री. तुळजा भवानी क्रीडा संकुल उस्मानाबाद येथे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. परंतु विषय होता आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष २०२३. त्यामुळे सर्व स्पर्धकांनी पौष्टिक तृणधान्य अबाबत जनजागृती होईल या उद्देशाने संपूर्ण असलेल्या रांगोळ्या साकारल्या होत्या. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत तालुका कृषि अधिकारी कळंब या संघाने सामुहिक पद्धतीने काढलेल्या रांगोळीला प्रथम पारितोषिक मिळाले. वैयक्ततिक रांगोळी स्पर्धेत डी बी चौधरी यांना प्रथम पारितोषिक मिळाले. भावना भालेराव यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. या स्पर्धेचे परीक्षण श्रीमती वर्षा मारवाळीकर यांनी तसेच श्रीमती लिमकर शीतल यांनी केले. स्पर्धेचे आयोजन नगर परिषदेच्या नाट्य गृह परिसरात केले होते. सर्व विजेत्या स्पर्धकांना मा. विभागीय कृषि सह संचालक लातूर श्री. साहेबराव दिवेकर यांच्या हस्ते देण्यात आले. पाककला तसेच रांगोळी स्पर्धा श्रीमती शितल लिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आल्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →