उस्मानाबाद येथे जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य पाक कला स्पर्धेचे आयोजन

उस्मानाबाद जिल्हा कृषि विभागाच्या वतीने वरशील कला क्रीडा महोत्सव उस्मानाबाद येथे दिनांक २६ जानेवारी २०२३ ते २८ जानेवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले होते. सदर स्पर्धेत मैदानी खेळांसमवेत पाककला स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते. या पाक कला स्पर्धेत नाचणीची इडली, नाचणीचा डोसा बाजरीच्या करंज्या ज्वारीचा चिवडा बाजरीचे धपाटे,बाजरीची खिचडी मिक्स तृणधान्य घुगऱ्या सर्व तृणधान्य पासून बनवलेल्या भाकऱ्या तृनाधाण्याचे पकोडे इ. पदार्थ तयार करून स्पर्धेत ठेण्यात आले होते. या स्पर्धेत मंदा चौधरी विजेत्या झाल्या. त्या भूम तालुक्यातील कृषि सहायक आहेत. या स्पर्धेचे परीक्षण कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील गृह विज्ञान तज्ञ श्रीमती. वर्षा मारवालिकर यांनी केले. स्पर्धेस मा. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी महेश तीर्थकर प्रकल्प संचालक आत्मा श्री. जे. पी. शिंदे कृषि उपसंचालक श्री. अभिमन्यू काशीद इ उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →