आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी तहसील कार्यालय परिसर, गोंडपिपरी येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर यांचे मार्फत पौष्टिक तृणधान्य पासून बनविलेल्या पाककृती चे प्रदर्शनी आयोजित करण्यात आली, यावेळी मा. उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी श्री संजयकुमार डव्हळे, मा. तहसीलदार गोंडपिपरी श्री के डी मेश्राम सर, मा. गट विकास अधिकारी गोंडपिपरी श्री माऊलीकर साहेब, मा. पोलिस निरीक्षक गोंडपिपरी श्री जीवन राजगुरू साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री मंगेश पवार तसेच सर्व कृषी कार्यालय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रम असल्याने गावातील नागरिकांनी या प्रदर्शनी ला चांगला प्रतिसाद दिला.