रोटरी क्लब ऑफ मंचर व अनुसया महिला उन्नती केंद्र मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी महोत्सव 2023 मंचर येथे मा. तालुका कृषि अधिकारी श्री टी. के. चौधरी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 27/01/2023 ते 30/01/2023 पर्यंत कृषि विभागाचा स्टॉल लावून शेतकरी यांना माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. श्री. विवेकदादा वळसे पाटील, पुर्वाताई वळसे पाटील संचालिका राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र यांनी कृषि विभागाच्या स्टॉल ला भेट देऊन माहिती घेतली तसेच सेल्फी काढले समवेत कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते