दि. २४. ०१. २०२३ रोजी ता. गंगाखेड जि. परभणी येथे संपन्न झालेल्या जिल्हा मासिक सत्र आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला. या चर्चासत्रात झोला पिंपरी, दुसलगाव, इसाद, जवळा रु. इ. गावांतील प्रक्षेत्र भेट देऊन शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य पीक लागवड, व्यवस्थापन तसेच तृणधान्य महत्त्व याबद्दल व.न. म. कृ. वि. चे शास्त्रज्ञ डॉ. गडदे , डॉ. जगताप, तसेच तालुका कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे यांचेमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच याप्रसंगी पौष्टिक तृणधान्य न्याहारीचे आयोजन करण्यात आले, यात तृणधान्य पासून टायर केलेले पदार्थ शेतकऱ्यांना तसेच प्रमुख पाहुण्यांना देण्यात आले.