आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निम्मित महाराष्ट्र शासन कृषी विभाग कराड मार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त कृषिचित्र रथाचे संचलन

महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कराड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी शिवाजी क्रीडा संकुल कराड जिल्हा सातारा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण व संचालनाच्या वेळी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे मार्फत संचालनामध्ये आंतरराष्ट्रीय पोषक तृणधान्य वर्ष या विषयाचा चित्ररथ करून संचलन करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ वर्ष हे आंतरराष्‍ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे घोषित केले असुन पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व, ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा यांसारख्या पौष्टिक तृणधान्याचा रोजच्या आहारात सर्वांनी समावेश केला पाहिजे. ही पौष्टिक तृणधान्ये ग्लुटेन मुक्त असून ती कॅल्शियम, लोह, झिंक, आयोडीन इत्यादी सारख्या सुक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध असतात. ही तृणधान्ये डायरिया, बद्धकोष्ठता, आतड्यांच्या आजारास प्रतिबंध करतात, तसेच त्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, हृदय विकार, ॲनिमिया, उच्च रक्तदाब रोधक आहे. सदर पीकाकरीता आपल्या भागातील हवामान अनुकूल असल्यामुळे शेतकरी या पिकांची लागवड आपल्या भागात मोठ्या प्रमाणात करू शकतात. आधुनिक जीवनशैलीनुसार मानवाच्या दैनंदिन आहारात बदल झाला आहे. या बदलत्या आहारामुळे शरीरास आवश्यक पोषक तत्त्वांची उणीव भरुन काढून होणाऱ्या आजारांवर मात करण्याची गरज निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पांरपरिक आहाराला चालना देवून सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगता यावे यासाठी शासनाने पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्याचा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. भविष्यातील सुदृढ व आरोग्यदायी समाजासाठी प्रत्येकानेच या कार्यक्रमाचा भाग होवून पौष्टिक तृणधान्यांचा आहारात नियमित वापर करण्याची आवश्यकता आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये तर राळा, वरई, कोद्रा, सावा व राजगिरा ही इतर लघु तृणधान्ये आपली पारंपरिक पिके आहेत. पूर्वीपासून आपल्या आहारात असलेल्या या तृणधान्यांचा वापर शहरीकरणाच्या व पाश्चात्य अनुकरणाच्या ओघात कमी होत गेल्याचे कटू सत्य तर पिझ्झा, बर्गर आदी जंकफुडचा अवास्तव उपयोग वाढल्याचे चित्र आपल्या समोर आहे. परिणामी मधुमेह, उच्च रक्तदाब व लठ्ठपणा असे विकार वाढत आहेत. याचे दुष्परिणाम पाश्चिमात्य देशांच्या लक्षात आले आहे, म्हणूनच कोरोनानंतर आरोग्यविषयक सजगता वाढून या देशांमध्ये पौष्टिक तृणधान्याची मागणी वाढल्याचा अहवाल आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष चे औचित्य साधून मा. उपविभागीय कृषी अधिकारी श्री दौलत चव्हाण व मा तालुका कृषी अधिकारी श्री रियाज मुल्ला यांचे मार्गदर्शनाखाली चित्ररथाचे आयोजन करण्यात आले.संचलनावेळी माननीय खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री श्री बाळासाहेब पाटील, माजी विधान परिषद सदस्य श्री आनंदराव नाना पाटील उपस्थित होते व कृषी विभागाने केलेल्या चित्ररथाची प्रशंसा केली व सर्वांनी आहारामध्ये तृणधान्याचा वापर करावा असे आवाहन केले. यावेळी प्रांताधिकारी श्री उत्तम दिघे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रणजीत पाटील, तहसीलदार श्री विजय पवार, अधीक्षक भूमी अभिलेख श्री बाळासाहेब भोसले कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री रमाकांत डाके तसेच कराड येथील विविध प्रशासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →