मकर संक्रांति निमित्त या शेतीशाळे मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम

आज दिनांक 25/01/2023 रोजी करवंडे येथे क्रॉपसॅप अंतर्गत हरभरा पिक महिला शेतीशाळा आयोजित करण्यात आली, या कार्यक्रमात हरभरा पिक व्यवस्थापन संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मकर संक्रांति निमित्त या शेतीशाळे मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात सर्व महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला.

तसेच उपस्थित महिलांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पौष्टिक तृणधान्य व पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (pmfme) बाबत माहिती देण्यात आली ,येथील महिला सरपंच,‌ ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते, सदर कार्यक्रमात कृषी सहाय्यक, लोणावळा व कृषी पर्यवेक्षक खडकाळा 2 यांनी मार्गदर्शन केले. अल्पोपहार देऊन शेती शाळेचा समारोप करण्यात आला.
मंडळ कृषी अधिकारी कार्यालय खडकाळ

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →