रत्नागिरी दि.21.जाने 2023 कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन .

रत्नागिरी दि.21.जाने 2023 कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
पाककला स्पर्धेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी श्रीम. शुभांगी साठे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध महिला बचत गट, महिला वैयक्तिक याप्रमाणे एकूण 63 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये ज्वारी,बाजरी नाचणी,वरई, वरी, कोद्रा, अशा विविध प्रकारच्या तृणधान्य पिकांपासून बनविलेले नाचणीचे लाडू, नाचणी केक, कुरडी, शंकरपाळी,ज्वारीची पोटली बिर्याणी,नाचणीचे गुलाबजाम,नाचणी इडली व डोसे,वरीचे मोदक,ढोकळा., शेवया, नाचणी सत्वाची वडी,नाचणीचे मोमोज,वरिचे अनारसे ,घावणे,अशा प्रकारचे 180 पदार्थांचा यामध्ये समावेश होता.पाककृती स्पर्धेचे परिक्षक श्री.उदय गोखले यांनी सदर कार्यक्रमाचे परिक्षण केले.
पाककृती स्पर्धेचे विजेते .श्रीम.प्रज्ञा जयंत फडके प्रथम क्रमांक यांना देण्यात आला. श्रीम.अवनी अमोल धनावडे.यांना द्वितीय क्रमांक व श्रीम.नुपुर निनाद पास्ते यांना तृतिय क्रमांक. वश्रीम.संजीवनी सुभाष जाधव.यांची उत्तेजनार्थ निवड करण्यात आली. विजेत्यांना बक्षीस वितरण मा.सह दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी श्री.एम.आर.सातव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कीर्ती कुमार पुजार यांनी प्रदर्शन स्टॉल्स व पाककला स्पर्धा स्टॉल्सना भेट दिली. तसेच श्री.शशिकांत जाधव तहसीलदार रत्नागिरी, यांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रकल्प संचालक आत्मा श्रीम उर्मिला चिखले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम भाग्यश्री नाईक नवरे, कृषी उपसंचालक श्री अजय शेंडे, तंत्र अधिकारी विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी नानाजी भोये,श्री.रोकडे,श्री.गावित,आदी उपस्थित होते.तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यामधील शेतकरी बंधूंनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →