आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष सन 2023 मौजे -मार्ली कुडाळ मंडळ ता. जावळी येथे तालुका कृषी अधिकारी जावळी रमेश देशमुख व मंडळ कृषी अधिकारी कुडाळ ज्ञानदेव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली, महिला मेळावा घेण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी मार्गदर्शक वक्ते कृषी सहाय्यक श्री.रावते व सदस्य उपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या महिला शेतकरी यांना श्री.रावते यांनी नाचणी,वरई,राजगिरा, ज्वारी व बाजरी इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकांसंदर्भात सविस्तर माहिती देऊन,पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील असलेले महत्त्व व फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.