आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मौजे वडमुखवाडी येथे बाजरी पिकाचे आहारातील महत्व सांगणारा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात माननीय कृषी पर्यवक्षक ढवळे साहेब यांनी सखोल मार्गदर्शन केले तसेच PMFME योजनेचे सहा घटक सांगितले. सौ खुडे मॅडम कृ.स. लोहगाव यांनी बाजरी पासून बनविण्यात येणाऱ्या विविध पदार्थांची पाककृती सांगितल्या. तसेच कृ. स. भोसले व मोरे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.