चोपडा : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य २०२३ (मिलेट ऑफ द मंथ) अंतर्गत निबंध स्पर्धा विजेत्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले…

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 मिलेट ऑफ दि मंथ अंतर्गत दिनांक 20/01/2023 रोजी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पारितोषिक देताना उपस्थित मान्यवर तालुका कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी कार्यालयातील विविध अधिकारी कर्मचारी तसेच प्रताप विद्या मंदिर चोपडा येथील मुख्याध्यापक व कृषी तंत्र विद्यालयातील प्राचार्य व समस्त प्राध्यापक कर्मचारी वर्ग तसेच कृषी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे विविध ग्रुप तयार करून त्यांना स्पर्धा परीक्षा निमित्त प्रश्नमंजुषाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. त्या प्रश्नमंजुषा मध्ये जास्तीत जास्त उत्तर देणाऱ्या ग्रुपच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. निबंध स्पर्धेत यशाचे मानकरी प्रथम पारितोषिक -फाल्गुनी बोरसे द्वितीय पारितोषिक-नयन पाटील तृतीय पारितोषिक – पूजा साळुंखे व उत्तेजनार्थ पारितोषिक-जागृती वाघ या विद्यार्थ्यांचे व सर्व सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच कृषी तालुका अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →