दिनांक 14/01/2023 ला मौजा केमारा येथे पौष्टीक तृणधान्य दीन कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये तृणधान्याचे आहारातील महत्व, विविध रोगांपासुन मानवी शरीराला दुर ठेवण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश ई. विषयावर मार्गदर्शन श्री. बारामते साहेब (मं.कृ.अ. पोंभुर्णा) यांनी बदलत्या खाणापानासुन स्त्रियांमध्ये दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्या व त्याकरीता तृणधान्य चा आहारात वापर याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर महिलांकरीता हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी केमारा चे सरपंच, महिला बचत गटाच्या सदस्या, महिला शेतकरी ई. उपस्थित होते.