आटपाडी जि.सांगली

मौजे कामत तालुका आटपाडी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने भारत सरकारने पुढाकार घेतल्याने संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलेले आहे त्या अंतर्गत मिलेट ऑफ मंथ या संकल्पनेतून कार्यक्रम घेण्यात आला. कृषी सहाय्यक रवींद्र घुटुकडे यांनी पौष्टिक तृणधान्य पिके बाजरी, ज्वारी, राजगिरा, राळा, वरई, नाचणी या पिकांचा पौष्टिक त्रणधान्यांमध्ये समावेश होत असल्याचे सांगितले. पौष्टिक तृणधान्यांमध्ये लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडीन इत्यादी सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश होतो. पौष्टिक तृणधान्ये डायरिया, बद्धकोष्ठता, आतड्याचे आजारास प्रतिबंध करतात तसेच त्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, हृदयविकार, ॲनिमिया, उच्च रक्तदाब रोधक आहेत. पौष्टिक तृणधान्य आधारित पदार्थ कॅल्शियमची कमतरता कमी करू शकत असल्याने मानवी आहारामध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. सदर कार्यक्रमास कामत गावचे आजी-माजी सरपंच, ज्येष्ठ नागरिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →